असहकार... मिरचीचा
लिखाण : अभिजीत अशोक इनामदार
भाज्यांचे, अन्नपदार्थ यांचे
अचानक भाव वाढणे हे काही आपल्याला नवीन नाही. सर्वसामान्यांच्या आयुष्यात हा तर सगळ्यात
मोठा भाग असतो. ठेकेदार, कंत्राटदार आपल्या पोळ्या भाजून घेत असतात... शेतकरी अन सर्वसामान्य
जन हताशपणे सारं पाहत असतात. यावरातीच भाष्य करणारी ही कविता.
गेलो होतो मंडईमध्ये अन आमची
नजरा नजर झाली
आत शिरताच मला एक हिरवीगार मिरची
भेटली
कोवळी कवळी लवंगी नव्हती ती कोल्हापूरची
हिरवीगार गोबऱ्या गालाची ती होती
शिमल्याची
मला पाहून म्हणते कशी "
काय भाऊ कुठे असता?"
आजकाल तुम्ही मला न घेताच का
हो घर गाठता?
प्रत्येक दुकानात माझ्यावर तुम्ही
नुसतीच नजर टाकता
प्रत्यक्षात घेऊन मात्र बटाटा
मुळा अन भेंडी जाता
तुमच्या आठवडी भाज्यांमध्ये मझा
मान चांगलाच वरचा आहे
पण आता कांद्याची पात मुळा अन
भेंडी यांनाच तुमची मागणी आहे
तुमचे हे असे वागणे माझ्या मनाला
क्लेश देत आहे
माझे असे हे काय चुकले हेच मला
ना उमगत आहे
मी म्हणालो " काय सांगू
बाई काय आमची व्यथा आहे
बाकी आम्ही इथे जगलो काय न जगलो
काय त्याची कोणास पर्वा आहे?
शिमला महाराष्ट्रात नसला तरी
आम्हाला तूच प्रिय आहेस
कारण महार्ष्ट्रीय नाशिक संगमनेरकरांनी
कांद्याचा भाव अटकेपार नेला आहे
रुपये शंभर मोजून सुद्धा किलो
दोन किलोच भाजी मिळत आहे
ठेकेदारांच्या गर्दीमध्ये शेतकऱ्याचा
हक्क हरवला आहे
कंत्राटदार ठेकेदार यांचा नंबर
मलईसाठी वरचा आहे
कष्टकरी करदात्यांचा नंबर सुविधांसाठी
मात्र खालचा आहे
आजच्या या घडीला असे वाटते आमचा
वाली इथे कोण आहे?
आमचा प्रत्येक प्रतिनिधी मात्र
आपल्याच पोळीवर तूप लाटण्यात मग्न आहे
लोकांसाठीच्या आंदोलनात राजरोस
राजकारण चालू आहे
म्हणूनच ग मिरची आता मला तुझी
मदत हवी आहे
म्हणूनच आज मंडईतूनच उठाव करायचा
मी ठरवलं आहे
तुझ्या सगळ्या बंधू भगिनीना यात
सामील करायचं आहे
तुमच्याच मदतीनी असहकार आंदोलन
पेटवायचं आहे
रास्त किमतीत भाज्या विका असं
ठेकेदारांना ठणकवायच आहे
तुम्हा सगळ्यांच्या मदतीनी असहकार
सुरु करायचा आहे
असहकार आंदोलनातून सामान्यांच
भाग्य बदलायचं आहे
ठेकेदारांची मलई गिरी कायमची
बंद करायची आहे
कष्टकरी करदात्यांना यातून दिलासा
द्यायचा आहे
माझा हा विचार मिरचीला तरी पटला
आहे
इतर भाज्यांना पटवण्याची तिची
खटपट सुरु आहे
ठेकेदारांविरुद्धचा असहकाराचा
प्रस्ताव भाजीमंडळात विचाराधीन आहे
लवकरच तो पास होईल अशी आपली माझी
भाबडी आशा आहे
©अभिजीत अशोक इनामदार
कामोठे, नवी मुंबई.
nicely worded .. loved it :)
ReplyDelete