सहवास
लिखाण : अभिजीत अशोक इनामदार
त्याचा सहवास म्हणजे जणु
सडा पारिजातकाचा
त्याचा सहवास म्हणजे जणू
सुगंध अत्तराचा
त्याचा सहवास म्हणजे जणु
झिरझीर पाऊस श्रावणातला
त्याचा सहवास म्हणजे जणू
गारवा ओल्या पावसातला
त्याचा सहवास म्हणजे जणु
बेदुंध करणारा आसमंत
त्याचा सहवास म्हणजे जणू
प्रेमवेडे करणारा वसंत
त्याचा सहवास मिळावा म्हणून
तिची काहीही करण्याची तयारी असे
तप्त उन्हात चालायला सांगा
तिच्यासाठी ते काहीच नसे
त्याचा तिचा सहवास हा
आहेच असा खास खास
कितीही मिळाला तरी
अजून थोडयाची असते आस ....
©अभिजीत अशोक इनामदार
कामोठे, नवी मुंबई.
No comments:
Post a Comment