प्रेम कधी संपलय का?
चेहऱ्याच ते खुलून येणं
सांगा सांगा .....
लिखाण : अभिजीत अशोक इनामदार
प्रेम कधी संपलय का?
अडवून कुणी अडलंय का?
तुम्हास जमलं नाही म्हणून
जग करायचं थांबलाय का?
काळजाचं ते हुरहुरण
पापणीच ते थरथरण
चुकलाच एखादा ठोका जरी
काळीज धडकायचं थांबलंय का?
दिवसापाठी सांज येणं
रात्री मागून पहाट होणं
रहाटगडगं कधी चुकलाय का?
थांबवून कोणी थांबलंय का?
चेहऱ्याच ते खुलून येणं
श्वासांचं ते फुलून जाणं
दाटून आला कंठ जरी
जीवन गाणं थांबलंय का?
शब्द शब्दांचं धुसमुसणं
भाव भावनांचं गुरफटणं
फुटलाच नाही जरी तोंडून शब्द
डोळ्यावाटे वाहायच्या भावना थांबतात
का?
प्रेम कधी संपलय का?
अडवून कुणी अडलंय का?
©अभिजीत अशोक इनामदार
कामोठे, नवी मुंबई.
No comments:
Post a Comment