Tuesday, 21 June 2016

कारण... तो बाप असतो (कविता)

कारण... तो बाप असतो

दिनांक : १९ जून २०१६

बायको जरी ऑपेरेशन थिएटर मध्ये प्रसूती वेदना सहन करत असली तरी

तिच्या अन होणाऱ्या काळजीने ज्याचा चेहरा काळवंडलेला असतो कारण...

तो बाप असतो

इवलासा जीव समोर आल्यावर, बायकोच्या डोळ्यातलं हसू बघून

जो जगाच्या जागी गद्गदतो कारण....

तो बाप असतो

ऑफिस, कामाचा ताण, वाढणाऱ्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्यांशी सामना करीत असताना

घरी आल्यावर झोपी गेलेल्या बाळ गोपाळांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतो कारण....

तो बाप असतो

चिमण्या पाखरांना पहिल्यांदा शाळेत सोडताना टिपं गाळणाऱ्या बायकोला समजावताना

उगी काय सारखं सारखं हळव व्हायचं म्हणताना त्याचा स्वर कातर होतो कारण...  

तो बाप असतो

स्कूल बसने जायची सवय नसलेल्या पाखरांना स्कूलबसने जायला लाऊन

त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी बसच्या मागे गाडीवर जाउन स्कूलच्या गेटवर जाउन उभा राहतो कारण... तो बाप असतो

थकून भागून घरी आल्यावर लेकाच्या हट्टापायी

त्याला खांद्यावर बसूवुन फिरवतो कारण...

तो बाप असतो

शाळा, नंतर कॉलेज अश्या एक एक पाहिऱ्या चढणाऱ्या मुलांच्या

पाठीशी जो भक्कम पणे उभा राहतो कारण...

तो बाप असतो

इतरांना काहीच अप्रूप नसलेल्या परीक्षा, स्पर्धा,

यातील मुलांच्या यशाबद्दल भरभरून बोलत राहतो कारण...

तो बाप असतो

लेकीच्या लग्नासाठी, लेकाच्या शिक्षणासाठी कर्ज काढतो

ते फेडण्यासाठी दुप्पट कष्ट करतो कारण...

तो बाप असतो

आपलेल्या झिजलेल्या चप्पलेचा, विरलेल्या शर्टचा जास्त विचार करत बसत नाही

कारण मुलाच्या मुलीच्या आनंदापुढे त्याला बाकी काही नको असते कारण…

तो बाप असतो

आपल्या मुलांबद्दल कोणी काही म्हटलं तर

त्याला बरोबर उत्तर देत असतो कारण….

तो बाप असतो

आता पाखरं नोकरी, करिअर नावाच्या आकाशात भरारी घेत असतात

पण त्याचे दोन मिचमिचे डोळे त्या पाखरांवर नजर ठेऊन असतात कारण...

तो बाप असतो

लेक फॉरेन ट्रीपला जाणार म्हणून त्याचा उर भरून येतो, मुलगा नको म्हणत असतानाही

एअरपोर्टवर फक्त गेट मधून आता जाणाऱ्या मुलाला बघता यावे म्हणून रात्री १.३० - २ वाजेपर्यंत जागतो कारण... तो बाप असतो

आता मुलाला / मुलीला मुलं होतात, ह्यांनी राखलेल्या दुधावर साय चढते

नातवंडांमध्ये रमून सुद्धा मुला-मुलीची काळजी करत राहतो कारण...

तो बाप असतो

आपल्या मुलांचं लहानपण वेळेअभावी न अनुभवता आलेला तो

आता नातवंडांच्या लीला पाहण्यात रमून जातो कारण...

तो बाप असतो

लहानपणी मुलांना अंगाई... गोष्ट सांगणे असे काहीच करू न शकलेला तो

आता नातवंडांना गोष्टी सांगताना थकत नाही कारण...

तो बाप असतो

म्हातारपणी लुकलुकणारी मान सांभाळत श्रीराम श्रीराम म्हणताना सुद्धा

माझ्या मुला-बाळांना सुखात ठेव अशीच प्रार्थना करत असतो कारण...

तो बाप असतो

©अभिजित इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  

आणि.... नर्मदा मला बोलावीत होती (कथा)

आणि.... नर्मदा मला बोलावीत होती    

लिखाण: अभिजीत अशोक इनामदार

दिनांक : १६ जून २०१६                     

सुबोध आजही दचकुन उठला. घशाला कोरड पडली… तसाच उठला डोक्याशी असलेला पाण्याचा तांब्या उचलला आणि घटाघटा पाणी प्यायला. बाजूलाच त्याची आई पडून होती. पलीकडच्या भिंतीला टेकून पिठवारती एक दिवा ठेवला होता. तो विझू नये म्हणून त्याभोवती एक वीट अन लोखंडी पाटी त्यावर पालथी घालून ठेवली होती. दिवा पेटता होता... हे त्या पाटीखालून येणाऱ्या मिणमिणत्या प्रकाशामुळे कळत होतेच. तरीही सुबोधने पाटी वर करून दिव्यातली वात सारखी केली. तेल घातले. दिवा आणखीनच उजळला. त्याबरोबर समोरची त्याच्या आण्णांची गुलाल बुक्का वाहिलेली अन तुळशीचा हार घातलेली तसबीर उजळून निघाली. हो… सुबोधचे अण्णा श्रीधर पंत आठ दिवसांपूर्वीच निजधामास निघून गेले होते. कसला आजार नाही की काही नाही. गेल्या वर्षी कंपनीतून रिटायर झाल्यापासून जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य. नेहमीच आपल्या मित्रपरिवारात रमणारे. एक दिवस सकाळी अजून का हे उठले नाहीत म्हणून सुबोधच्या माई उठवायला गेलेल्या अन त्यांच्या हंबरड्यानेच सुबोधला जाग आली. डॉक्टरला बोलावणे वगैरे मानसिक समाधान... आता काही उपयोग नाही हे त्याने ओळखलेच होते.

सगळे सोपस्कार झाले... बघता बघता आठ दिवस झाले. झोप लागत नव्हतीच... त्याने उगाचच कूस बदलून पाहिली. आण्णांची एक ना अनेक रूपं डोळ्यासमोर येत होती. मला बालक मंदिरात नेउन बसवणारे अण्णा, मी व्यवस्थित शिकावे म्हणून प्रसंगी आपल्याला ओरडणारे अण्णा, आपल्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू, खाऊ आणणारे, आपले सगळे हट्ट पुरवणारे अण्णा... मला चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळावा म्हणून झटणारे अण्णा, कॉलेजच्या फी साठी अर्ज काढणारे अण्णा... एक ना दोन किती रूपं आपल्या जन्मदात्याची. मला नोकरीला लागून ३ वर्षे झाली पण त्यांनी माझ्याकडे कधी काही मागितल्याची कुठलीच आठवण नाही.... एकही नाही? असेच अनेक विचार करत तो पडून राहिला. पहाटेच्या सुमारास कधीतरी डोळा लागला त्याचा….

दुसऱ्या दिवशी अण्णांच्या ग्रुपमधील काही लोक सुबोधला भेटायला आले. ह्याआधीही ते सारे येउन गेले होतेच. पण उद्याच्या १० व्याला काही मदत लागणार आहे का ते विचारण्यासाठीच ते आले होते. थोडावेळ थांबून दुसऱ्या दिवसाची रूपरेषा ठरवून ते निघाले. तोच सुबोधने त्यांचे निकटचे स्नेही देशपांड्यांच्याकडे पाहिले अन म्हणाला "काका थोडं बोलायचं होतं." देशपांडे बसले... बाकीचे निघून गेले.

सुबोध म्हणाला "काका मला गेले आठ दिवस स्वप्न पडतायत... मला त्यांचा अर्थ लागत नाहीये. काल सुद्धा पुन्हा तेच स्वप्न पडलं होतं. कसलीतरी अनामिक ओढ वाटत होती कोणीतरी बोलावीत होतं पण कोण तेच कळत नव्हतं. अण्णांची काही इच्छा राहिली आहे का?"

देशपांडे "मला तरी तसे काहीच बोलल्याचं आठवत नाहीये" म्हणाले.

सुबोधला काहीच उलगडा झाला नाही. आता उद्या जर पिंडाला कावळा शिवला नाही तर बघू काय करायचे असे म्हणून विषय सोडून दिला... १० व्याच्या दिवशी सगळे विधी झाले. काही केल्या पिंडाला कावळा शिवला नाही. म्हणून मग वाट बघून बघून शेवटी दर्भाचा कावळा करून त्याने पिंडाचा काकस्पर्श केला. त्याच वेळी सुबोधने अण्णांच्या अस्थि विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची काय इच्छा राहिलीय ते त्याला शोधायचे होते. अस्थींचे मडके घेऊन घराबाहेरच्या झाडाला बांधून त्याने इतरांचा, नातेवाईकांचा रोष पत्करला होता.

१३ वा १४ वा झाला. सगळी आवरा आवर झाली. अण्णांच्या अस्थि तश्याच बाहेर झाडाला लटकून होत्या. माई सुद्धा सुबोधला सांगून कंटाळल्या. आवरा आवरी करताना सुबोधला आण्णांची जुनी डायरी सापडली. खूप वर्षे अण्णा डायरी नियमित लिहित होते. गेल्या काही वर्षांमधेच त्यांनी ते बंद केले होते. काही पाने चाळता चाळता तो मधेच एखादे पान वाची... त्यासंदर्भातील आठवण ताजी होई... पुन्हा पान उलटले जाई. कित्येक छोट्या छोट्या गोष्टी अण्णांनी मनामध्ये आणि साहजिकच डायरीमध्ये कोरून ठेवल्या होत्या. काही कटू तर काही गोड आठवणींची पाने उलटली जात होती. अन एक पानावर तो थबकला.

अण्णांनी लिहिले होते:

आज आमचा सगळा ग्रुप नर्मदेला भेट द्यायला गेला... नर्मदा परिक्रमेला गेला. सगळ्यांनी बिनपगारी रजा घेतल्या आहेत. माझी सुद्धा खूप इच्छा होती पण गेल्याच महिन्यात सुबोधच्या कॉलेज प्रवेशासाठी कंपनीतून घेतलेल्या कर्जामुळे ते शक्य नाही. मला असणारे ह्या परीक्रमेबद्दलचे वेड आणि मला कायम मनात रुंजी घालणारी नर्मदा. माझ्या वडिलांबरोबर माझ्या लहानपणी मी केलेली ती परिक्रमा अन तेव्हापासून माझ्या मनात असणारी ओढ खरच शब्दात व्यक्त करता येत नाही... कारण ती अनुभवायलाच हवी. खरे तर साहेबांना विचारले असते तर ते नाही म्हणाले नसते कदाचित... पण पण आपला भिडस्त स्वभाव. असो. एकदा हे कर्ज फिटले अन सुबोध्चे शिक्षण झाले की मी निवांतच होणार आहे. मग सुबोधला हक्काने सांगेन मला नर्मदा परिक्रमा घडवून आण म्हणून. आज देशपांडेच्या हातात हात देऊन तेवढी माझ्यासाठी बाटलीभरून का होईना नर्मदा आण म्हणून सांगताना आपला स्वर किती कातर झाला होता. त्याने विचारले सुद्धा अरे श्रीधर काय झाले म्हणून पण मी मानेनेच काही नाही म्हणून सांगितले. जायची इच्छा खूप होती. माझ्या आप्पांच्या खांद्यावर बसून पाहिलेलं ते नर्मदेच पात्र, तिच्या पवित्र पाण्यात स्नान करणारे साधू-संत, परिक्रमा करणारे लोक अन मला साद घालणारी नर्मदा... हे चित्र सहज डोळ्यापुढे उभे राहते…..

पुढे अण्णांनी काही लिहिले नव्हते. काही टिपं गळून पडल्यची साक्ष मात्र डायरीचे ते पान मात्र नक्की देत होते. काहीतरी ठरवल्या सारखे सुबोध उठला माईला हाक मारली अन आपला प्लान सांगितला. माईने बाकी काही विचारण्यापुर्वीच त्याने तिच्यासमोर आण्णांची डायरी धरली. डोळे भरल्या सुबोधचा चेहरा पाहून माईंनी ते पान भरभर वाचून काढले. अन मुकपणेच त्याला अनुमोदन दिले.

सकाळीच आवरून त्याने बाहेर पडताना अण्णांच्या अस्थि व्यवस्थित ब्यागेत ठेवल्या. दारात निरोप द्यायला उभ्या माईला सुबोध म्हणाला "आयुष्यभर त्यांनी कधीच काही मागितले नाही... नेहमीच देत आले. आपली स्वप्न इच्छा... कशाचाच विचार केला नाही. खरेतर अण्णाच मला हे सुचवत होते स्वप्नांमधून, मलाच हे कळायला उशीर लागला. मी उगाच घाबरत होतो त्या स्वप्नांना... खरे तर अण्णांची इच्छा पूर्ण करायची होती आणि म्हणूनच… नर्मदा मला बोलावीत होती.”

©अभिजित इनामदार
  कामोठे, नवी मुंबई  

Friday, 10 June 2016

रिझल्ट (लेख)

रिझल्ट

लिखाण: अभिजीत अशोक इनामदार
दिनांक : ८ जून २०१६

दहावीचा रिझल्ट लागला. अमितला ८१% मार्क्स मिळाले. नेटवरती आपला रिझल्ट त्याने पुन्हा पुन्हा चेक केला. फक्त ८१%? तो स्वतःच अस्वस्थ झाला. त्याला ९२+% ची अपेक्षा होती. अमित तसा सुखवस्तू कुटुंबातील मुलगा. वडील इंजिनिअर, मल्टी न्याशनल कंपनीमध्ये म्यानेजर, आई ब्यान्केमध्ये अधिकारी. श्री. आणि सौ. एकलव्ये यांचा एकुलता एक मुलगा. घरात कुठल्या गोष्टींची कमतरता नाही.

आई वडिलांनी कधीच आपल्याला अभ्यासाचं किंवा रिझल्टच टेन्शन दिलं नव्हतं की कधी एवढेच मार्क्स मिळायला हवेत म्हणून कधी त्याच्या मागे लागले नव्हते. अमित विचार करत होता “आई बाबा नेहमी मी नीट अभ्यास करतो का, मला काही अडचण आहे का, मला काही हवय का हे नक्कीच बघतात... त्यांच्याकडे वेळ नसतो हि बाब सोडली तर काहीच कमी पडू दिलं नाही त्यांनी.. त्यांनी कधी कसल्याच अपेक्षा ठेवल्या नाहीत माझ्याकडून? त्यांनी कधी बोलून नाही दाखवले पण त्यानाही वाटत असणारच ना कि आपल्या मुलाने ९०% पेक्षा जास्त मार्क्स मिळवावेत. त्यांच्या ऑफिस मधील इतर कलीग्जच्या मुलांना मिळाले असतील तसे मार्क्स तर…. त्यांना शरमल्या सारखं होईल का?”

नुकतच मिसरूड फुटलेल्या १६ वर्षांच्या अमितच्या मनात वादळ उठलं होतं. “एवढ सगळ पुरवून सुद्धा तुला मार्क्स मिळाले नाहीत असे जर ते म्हणाले तर?” अमित पुरता खजील झाला. त्यात नुकताच समोरच्या झोपडपट्टीतल्या दीपकने कसल्याही सुविधा नसताना ९१% मार्क्स मिळवले होते त्याची चर्चा बिल्डींगभर होत होती. अमितला अजूनच शरमल्यासारखे झाले. बाबांनी काय काय नाही केले आपल्यासाठी? क्लासला जाण्यासाठी स्कूटर, मार्केटमधील बेस्ट ट्युटोरिअल्स, ब्रांडेड पेन, पेन्सिल, कंपास, खाण्यापिण्याच तर विचारूच नका... आपल्यामुळे आपल्या आई बाबांना लाज येईल? श्या... आपण काहीच कामाचे नाही आहोत.” त्याचा जीव घुसमटला, डोळ्यातून अश्रू वाहू लागले, जीव आफाट दुखावला गेला, स्वतःवरच तो खूप चिडला. “काही तरी करायला हवे... काही तरी करायला हवे... पण नक्की काय करायचे? कशाला जगायचे असे जिथे आपण आपल्या आई वडिलांना हा साधा आनंदही देऊ शकत नसू तर?”

“संपवून टाकू हा जीव... नकोच ते अपेक्षाभंगीत जिणं... काहीच नको”. अमित ताडकन उठला. टेरेसकडे  धावला. कठड्याजवळ उभा राहिला… खोल श्वास घेतला... आता वरती चढायच अन स्वतःला झोकून द्यायचं अन संपवून टाकायचं सगळं. पण एकदम विचार आला, “जर एवढ्या वरून पडून जर जीव गेलाच नाही तर? कायमच अपंग वगैरे झालो तर? तर आई बाबांना अजून त्रास होईल ना?” तो पुन्हा माघारी घरात आला. “त्यापेक्षा विष घेऊ... कोणालाच कळणार नाही. पण घरात विष कुठले? बाथरूम क्लिनर घ्यावे का? नकोच त्याचा वास सहन होत नाही आपल्याला... पिणार कसे? बेस्ट वे... हॉल मधल्या पंख्याला दोरी बांधणे अन लटकणे...” दोरी नव्हती... आईच्या ड्रेसची ओढणी घेतली. स्टूल वरती उभाराहून ओढणीचं एक टोक पंख्याला बांधलं दुसरं त्याचा फास करून, तो गळ्यात अडकवला. ढगफुटी व्हावी तश्या अश्रुधारा त्याच्या डोळ्यातून वाहत होत्या. निर्धाराने त्याने डोळे पुसले. बास झालं आता फक्त पायाखालचा स्टूल ढकलून द्यायचा अन करून टाकायचा शेवट ह्या असल्या जगण्याचा. आई वडिलांची आठवण झाली आणि शेवटचं त्यांना बघून घ्यावे म्हणून त्याने खिशातून मोबाइल काढला. नुकत्याच झालेल्या त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी काढलेला त्या दोघांचा फोटो मोबाइलवर डिस्प्ले पिक्चर होता. त्यांचे प्रसन्न, हसरे चेहरे पाहून त्याचे डोळे भरून आले. त्याने डोळे मिटले... बस एक क्षण... आता स्टूल ढकलणार तोच…. त्याचा मोबाइल किणकिणला... सगळे पाश सोडून जाताना सुद्धा माणसाला निर्धोकपणे जाता येत नाही... तो तर १६ वर्षांचा कोवळा मुलगा होता. त्याने डोळे उघडून पाहिले... नोटिफिकेशन मध्ये आईचा व्हाट्सअप मेसेज होता... मराठीमध्ये काहीतरी लिहिलं आहे. आपले मार्क्स तिला आवडले नसावेत त्याबद्दलच असावा मेसेज... जाऊ दे. पण परत विचार आला काय आहे मेसेज ते तरी पाहू... जीव काय द्यायचाच आहे. त्याने गळ्यातला फास काढला, स्टूल वरून उतरला अन कोचवर बसला.

आई ने लिहिले होते "माझ्या सोन्या अमित, हो.... मला माहित आहे तुला असे म्हटलेलं आवडत नाही... तू मोठा झाल्यास नाही का? पण जर तू नोटीस केले असशील तर तुझ्या लक्षात येईल जेंव्हा मी प्रचंड खुश असते तेव्हाच तुला असे म्हणते. तू म्हणशील हे काय आई आज पत्र टाईप मेसेज वगैरे पाठवतीय... पण सगळ्याच गोष्टी नाही ना रे बाळा बोलून दाखवता येत. त्यात मघाशी तुझा रिझल्ट लागण्याआधी मनात एक अनामिक भीती वाटत होती. जीव घाबरल्यासारखा झाला होता. तुझीच सारखी आठवण येत होती. पण आता मी खूप खूप आनंदी आहे. पण एक सांगू बाळा तो आनंद फक्त तू आणि तूच दिलायास. कारण अरे मी पाहिलेय ना माझ्या अनेक मैत्रीणीना त्यांच्या मुलांना दिवसातून खूपदा फोन करताना, त्यांना अभ्यास करतोय की नाही विचारताना. मी अन तुझे बाबा आम्ही दोघांनीही कधीच असे केले नाही. बर्याचदा रात्री तू अभ्यास करताना तुला कंपनी म्हणून तुझ्या बरोबर जागावे वाटे पण दिवसभराच्या कामाच्या दगदगिने कधी डोळा लागायचा कळायचंच नाही. बाबांचा तर माझ्या आधीच डोळा लेगतो हे तर तुला ठाऊकच आहे. त्यातून बाबा तर बर्याचदा कंपनीच्या कामासाठी बाहेरच गेलेले असायचे. तुला गरजेच्या लागणाऱ्या वस्तू आम्ही देत होतो रे पण तुला द्यायला वेळ नव्हता रे आमच्याकडे. तरीही तू आज जे हे यश मिळवले आहेस ते खूप आनंददायी आहे आम्हा दोघांसाठी.

तुला वाटत असेल इतरांना कसे जास्त गुण मिळाले… अरे आपण पाहतो एकाच झाडाची पाने, फळ एकसारखी नसतात, आपल्या हातांची बोटे एकसारखी नसतात मग सगळ्या मुलांची बुद्धिमत्ता सारखीच कशी असेल? अन मुळात आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे काय असेल तर ते म्हणजे आपले १००% योगदान अन तू तुझे १००% योगदान दिलेस हे आम्हाला दिसत होते अन म्हणूनच आम्ही खुश आहोत. तुझ्या योगदानाला तू गुणांच्या टक्केवारीच्या कसोटीवर तोलू नयेस असे आम्हाला वाटते.

हे बघ बाळा हा रिझल्ट म्हणजे तुला मिळालेले गुण आहेत तुझी गुणवत्ता नव्हे. अन तुझी गुणवत्ता खूप चांगली आहे हे आम्ही जाणून आहोत. ह्या मार्क्सवरती सुद्धा तुला चांगल्या कॉलेजला अडमिशन मिळेल. मुळात आम्ही तुला कसलीही मदत न करता तू हा एवढा मोठ्ठा टप्पा पार केलास याचंच मुळी आम्हाला कौतुक आहे. आपले आई बाबा आपल्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत असे जर तुला मनातून वाटत असेल अन तुला आम्हाला सांगता येत नसेल तर काही हरकत नाही आम्हाला जाणीव आहे त्याची. अन तीच मनातील सल भरून काढण्यासाठी हा पत्र प्रपंच.

पण आम्ही तुझ्यासाठीच, आपल्या भविष्यासाठीच ह्या नोकर्या करतो असा बचाव मी करणार नाही. त्यातून लवकरच काहीतरी मार्ग काढायला हवा. तूर्तास तुझ्या अपेक्षांना तुझे आई बाबा खरे उतरले नसतील तर त्याचा राग मनात धरू नकोस. मोठ्या मनाने त्यांना माफ करून टाक.

तुझेच
आई बाबा

ता क. : लवकर तुझी ब्याग भरून ठेव आपण आज रात्रीच मस्तपैकी फिरायला जात आहोत. आम्ही दोघांनीही २ आठवड्यांची सुट्टी काढली आहे. आधी आठवडाभर फिरून येऊ अन मग कॉलेज अडमिशन चे पाहू.

आईचा मेसेज वाचून अमित ढसाढसा रडला... पण त्याच्या मनावरचं असंख्य नकारात्मक विचारांचं ओझं झटक्यात उतरलं.... आईची ओढणी, स्टूल जगाच्या जागी गेले. अन हसत गुणगुणत अमितने ब्याग भरायला घेतली.

दहावीच्या रिझल्ट दिवशीच एकलव्यांच्या फ्यामिलीने अतिशय कठीण असा भावनिक, हळवा अन गुंतागुंतीचा पेपर दिला होता. दैवशक्तीने म्हणा किंवा पूर्वपुण्याईच्या जोरावर म्हणा रिझल्ट मात्र त्यांनी आपल्या बाजूने लावला होता.

©अभिजीत अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई ४१० २०९

Wednesday, 1 June 2016

विश्रामपूर... आग्रा... विश्रामपूर (मनोगत)

कट्यार काळजात घुसली हे नाटक जरी आपल्यापैकी बर्याच जणांनी पहिले नसले तरी नुकताच आलेला चित्रपट बर्याच जणांनी पाहिला असेल. त्यातील खांसाहेब आणि त्यांची बेगम ही दोन पात्रे जर बोलू लागली तर... माझ्या नजरेतून ते काय बोलतील ह्याचे वर्णन खाली आहे. अर्थात जेव्हा मी “माझ्या नजरेतून” म्हणतो तेव्हा मूळ नाटक, चित्रपटाची कथा ह्याच्याशी त्याचा कसलाही संबंध नाही याची कृपया नोंद घ्यावी.

विश्रामपूर... आग्रा... विश्रामपूर


दिनांक : ३१ मे २०१६
लेखन: अभिजीत अशोक इनामदार

विश्रामपूर: ये कहानी हम किसीको क्यू बताये भला.... किसीको क्या और क्युं दिलचस्पी हो सकती है! हां  हम... हम वही है आफताब हुसैन बरेलीवले... खांसाहेब इस नाम से भी आप मे से कई लोग जानते है हमे| आप के लिये तो हम वही अपराधी है, जीन्होने पंडितजी के साथ धोका किया| उनकी आवाज छीनली| वही अपराधी खांसाहेब... लेकिन क्या आप जानते है की हम अकेलेही गुनेहगार नही थे| गुनेहगार थी वोह दशेहेरेकी वो मेहफिल जिसमे दो कलाकारो को एक दुसरे के खिलाफ खद कर दिया| आपस मे लडाया| आपको क्या लागता है... की जीन पंडित भानुशंकर शास्त्रीने हमे मिरजसे विश्रामपूर बुलाया| रेहनेको छत दिलवायी, हमारी बेटी को संस्कृत पाठशाला मे दाखिला दिलवया उनके बारे में ऐसा कुछ करनेकी सोच भी कैसे सकते थे?
पंडितजी के लिये हमारे दिल मे आदर जरूर था, पर हर साल दशेहरा मेहफिल मे होती हुई हमारी शिकस्त हमे साल दर साल कमजोर बनाती गयी| लेकिन फिर भी हमने कभी पंडितजी का बुरा नही सोचा था| एक बार लोगोंके ताने सून सुनके हमने हमारी जान लेनेकी कोशिश की थी| वोह भी एक कमजोर पल का हमारे सिनेपर किया गया एक वार था| हम अपने आप को संभाल नही सके थे| पर हमारे मन मे सबसे ज्यादा नाराजगी तब हुई जब पंडितजी ने आके केह दिया की "आप एक बार केह देते तो मै राजगायक पद छोड देता!" क्या हमारी गायकी, हमारी मेहनत कुछ भी नही थी की वोह राजगायक पद हमे पंडितजी ने छोडा इसलिये हमे नसीब हो? बेशक इस बात का जवाब “नही” ऐसा ही है| हमारे घराने की गायकी भी लाजवाब थी, है और हमेशा रहेगी| १४ साल हारने के बावजुद हमारे मन में कभीभी पंडितजी को कुछ करने का खयाल तक नहीं आया| हमारी बेगम को तो राजगायक की शानोशौकत, वोह हवेली, वोह पैसा दिख रहा था| हमे अपने घराने की गायकी, हमारे सुरोंकी तारीफ हो... वही काफी था| लेकिन वोह तारीफ दशेहरा मेहफिल की जीत की मौताज थी जो की हमे कतहि पसंद नही था| हमारे घराने की गायकी को उसका सम्मान दिलाने की हमारी कोशिश को बेगमसाहिबा ने राजगायक पद की चाहत समझा| कितनी बडी भूल हो गयी| अगर ऐसाही होता तो हम ऐसा कुछ बहोत पेहले कर बैठते ना की हर साल पंडितजी से मुकाबला करते|
हमे आज भी याद है वोह मेहफिल जिस में पंडितजी गा नही सके थे| पर उस वक्त हमारी बेगम से पंडितजी की आवाज छिनलेने का गुनाह हो चुका है ये हम नही जानते थे| जब हमे वो बात पता चली तब तक देर हो चुकी थी| उस दिन हम बहुत खुश थे की हमारी इतने सालों की मेहनत रंग लायी थी| मगर ये बात सुनने पर तो हमने हमारी जीत का जश्न भी नही मनाया था| ये गुनाह हमारे बेगमसाहिबा ने किया था जो की हमे बिलकुल पसंद नही था| इसलिये हमने उनसे रिश्ता तोड दिया था| हमारे घरानेकी गायकी को जीताने के लिये ऐसा कुछ किया गया ये हमारे समझके बाहर था| पंडितजी को लागा ये हमारी साजिश थी... पर वोह हमारी साजीश नाही थी| बेगमसाहिबा ने कहा के हमारी तकलीफ, हमारा दुख, हमारा दर्द उनसे देखा नही गया और उन्होने ऐसा कर दिया| पर हम जानते है की वोह गुनाह है और कभी माफ नही किया जा सकता|

आग्रा: हम वोही बदनसीब खांसाहेब की बेगम है जिसे कभी कुछ हासील ना हो सका| पेहले हम मिरज से विश्रामपूर आये तो वोह पंडतकी बदौलत. पर खांसाहेब को वोह मान मरातब, शानोशौकत नसीब नही हुई| उनकी नाराजगी वोह कितनी बार भी चाहे पर हमसे छुपा नही सकते थे| उनकी गायगी बिलकुल दुरुस्त थी पर न जानो दरबार में वो किसीको क्यू पसंद नही आ रही थी| हर साल हुई शिकस्त उनको और उदास बनाती गयी| एक बार तो उन्होने अपने आपको खतम करनेकी कोशिश की| हमसे उनकी वोह हालत देखी नही गयी| क्या करती.... प्यार जो करती थी उनसे... मतलब अब भी करती हु पर अब वोह मेरे शोहर नही रहे| हां उनको जीताने के लिये हमने पंडत को सिंदूर खिलाया| हमने सबसे बडा गुनाह किया| और कुछ नही चाहा... वोह जीत जाये... खुश रहे यही एक तमन्ना थी| वोह जीत तो गये पर हमारी जुदाई की किमत पर| हमे दूर कर के वो दुनिया की नजरोंसे खुद को तो बचा सके, पर क्या पता खुदीही कि निगाहों से कैसे बचाते है खुद को|
वो जानते है के ये सब मैने अपने आप के लिये नही किया था| उनका तील तील मरना मुझसे देखा नही गया... और मैने ये गुनाह कर लिया| हां... मै जानति हु के मैने गुनाह किया है| और मै ये भी जानति हुं की उसकी सजा उन्हे नही मीलनी चाहिये| लेकिन वो सिर्फ एकबार प्यारभरी नजरोंसे केह देते की "बेगम आपने हमारे लिये इतना बडा कदम उठाया? इतना इश्क फरमती हो हमसे?" हम तो बस ये सुनने के लीये बेताब थे| वोह ऐसा केह देते तो हमारी हजारो जिंदगानिया उनपर कुर्बान कर देते हम… पर हमारे नसीब ना वो प्यार आया जिसकी हमे ख्वाइश थी| लेकिन उन्होने अपने घराने की गायकी के आगे कभी कुछ सोचा हि कहा? उनके सूर, उनकी गायकी यही उनका नसीब था| हमारे नसीब मे तो तलाखनामा आया| आखिर गुनाह किया है हमने... उनसे इश्क फरमाने का गुनाह, वोह… और उनकी गायकी जीत जाये ये चाहत रखने का गुनाह, उनकी जीत हो इसलिये पंडतकी आवाज छिन लेने का गुनाह... इतने सारे गुनाह किये.... सजा तो मीलनी ही थी|
 
विश्रामपूर: शायद बेगमसाहेबा की आरजू होगी की हम उन्हे केह दे की… “क्यू उन्होने यह गुनाह हमारे लिये किया|” पर वोह हम नही कर सकते| ऐसा कर के हम उन्होने जो गुनाह किया है उसकी हयमियत नही कर सकते| ऐसा करके उन्होने हमारे हुनर, हमारी गायकी को भी शक के कटघरे में लाके खडा कर दिया जो हमे कतही पसंद नही| पंडितजी जब गाये नही... तब उस बात को अपनी जीत ना मानकर हम हमारे १४ सालोकी मेहनत, हमारी गायकी को हराना नही चाहते थे| हमारी बेटी ने हमे मौकापरास्त कहा... जब हमारी बेगम ने गलती की… उसका फायदा हमने उठाया, सदाशीव ने गलती की उसका फायदा हमने उठाया| मगर हमने दोन्होसे गलती करनेकी चाह नही रख्ही थी| पर उसके बावजुद… हमसे हारे हुये सदाशीव को हमने दुसरा मौका दिया| अगर हम उससे, उसकी गायकीसे डरते तो उसे वो मौका हम कतही नही देते| लेकिन हमने वोह दिया|
जब सदाशिव ने हमारे घराने की गायकी का अंदाज चुराया… हमे बहोत तकलीफ हुई उस बात से| सदाशिव को हम कभी मारही नही सकते थे| उसको मारने कि चाह तो सिर्फ और सिर्फ अंदरुनी नाराजगी की वजहसे थी… क्युंकी हम उसके जैसा शागीर्द हमारे घरानेमे बना नही सके| मगर उसकी गायकी सुनकर तो ऐसा लागा की क्यू हम ये अलग अलग घरानोकी गायकी को लेकर बैठ गये| कीस चीज का गुमान जिंदगीभर लेकर बैठे| उसकी गायकीने हमारे अलग अलग घरानोंकी अलग अलग गायाकिके अंदाजकोही सुरंग लगाया| ये हमारी सोच के परे था| इसीलिये उसको अपना शागीर्द बनानेकी उसकी चाह को हमने स्वीकार नही किया| अब ऐसे फ़नकारको हम क्या तालीम देनेवाले थे| पंडितजीकी आवाज जाने की वजह्को भी भरे दरबार में, हमे जिम्मेदार ठहराया गया था| भलेही गुनाह किसी और ने किया था... पर वो हमारे लिये किया था| हमने इतनी बरसो तक जो हमारी पेहचान बनायी थी जो सिर्फ हमारी गायकी कि वजह से थी और ऐसी शखक्सियत को उस दिन भरे दरबार में खुनी बताया गया था| क्युंकी हम सच्छे फ़नकार है और हमारे अंदर का फ़नकार जिंदा है, इसलिये हमने खुदही को सदाशिव के गुरु बनने के लायक नाही समझा| हमने वहा से निकल जाने का फैसला किया|

आज हम सोचते है... हमारी चाह तो सिर्फ इतनीही थी की हमारी घराने की गायकी को सराहा जाय| जो बित गया उसे हम चाह्कर भी बदल नही सकते| लेकिन अगर हम गलत थे तो और भी कई चीजे गलत थी| गलत था वो विश्रामपूर का दरबार जिसने ऐसी प्रतियोगिता रखी| गलत थी वो कटार और उसके इस्तमाल का हक जो जितनेवाले को दिया जाता| गलत था वो अलग अलग घरानोकी गायकी को आपस मे टकराना… जीससे आपस में प्यार और भाईचारे की जगह आपस में रंजिशे मुकम्मल हो|

हमारी इन बातो से हर कोई सहमत हो नही सकता ये हम जानते है, लेकिन हमारी एकही ख्वाइश है के जब जब इतिहास के पन्नो में गायकी का जिक्र हो... तब तब हमारा नाम हमारे घराने की गायकी की वजहसे हो.... ना की पंडित भानुशंकर शास्त्री के आवाज के कातील इस वजह से... क्या ये मुमकिन है?     

©अभिजीत अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई ४१० २०९

Monday, 23 May 2016

अभिमानाचा एक सलाम (कविता)

अभिमानाचा एक सलाम

अभिजीत अशोक इनामदार

दिनांक : जानेवारी २०१६

सतत देशसेवेचा विचार करणाऱ्या त्यांना
स्वतःसाठी असा वेळ होताच कुठला
कुठे बर्फाच्छादित शिखरांवर
तर कुठे प्रत्यक्ष सीमेवरच्या ज्वलंत आगीवर
कुठे रखरखीत वाळवंटात
तर कुठे समुद्रात लाटांशी झुंजत
सतत.... सतत लोकसेवेसाठी जगलेल्या
त्या जवानांना झोप होतीच कुठे…?

आम्ही नाताळच्या सुट्ट्या मजेत एन्जोय करतोय
नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्या झोडतोय
लॉंग वीकेंडच्या सुट्ट्यांचे नियोजन करतोय
कुठे समुद्र किनारा तर कुठे हिल स्टेशन ठरतंय
त्यांचा मात्र नाताळही तिथेच अन नव वर्षही
कधी कुठे काही अनामिक नाही घडलं
अन स्वस्थतेचे काही तास मिळाले
तर तोच विकेंड अन तेच हिल स्टेशन

रात्र रात्र पार्ट्या झोडून सकाळी उशीरपर्यंत लोळणारे आम्ही सुरवंट
आगदी सराईत पणे विसरून जातो
रात्र रात्र जागून डोळ्यात तेल ओतून सीमेवर पहारा देणारे ते जवान तिथे आहेत म्हणूनच
आम्ही भरल्या पोटी घराच्या दिवाणखाण्यात एका हातात बडीशेप अन दुसर्या हातात टी.व्ही. चा रिमोट घेऊन बसू शकतो  

यंदा थंडी खूपच पडलीय नाई? गरम कपडे घेतले पाहिजेतम्हणताना
आम्ही हमखास विसरून जातो
त्या तिथे उंच हिमाच्या शिखरावर कोणीतरी जवान उणे तापमानात बसलाय...
आमच्या सारख्यांच्या कृश देहाचं वाळवण राखण करीत... अस्ताव्यस्त देशभर पसरलेलं

रखरखीत उन्हाळ्यात लेट्स गो टू कुल प्लेस
असे ठरवताना आम्ही सहज विसरून जातो
त्या तिथे वाळवंटात कोणीतरी जवान स्वतःच्या जीवाची काहिली करत अन स्वतःचाच घाम पीत
बसलाय पन्नासाच्या तापमानात.....  आम्हाला गारव्याला जाता यावे म्हणून

थर्टी फर्स्टला तर काय आम्ही मद्याच्या
महापुरात डुंबून जातो अन साफ विसरून जातो...
त्या तिथे दूरवरच्या पोस्ट वर अन्न पाण्याविना एक जवान बसलाय शत्रूशी लढा देत
फक्त आणि फक्त लाल रंगाची रंगपंचमी खेळत.... आम्हाला मनमुराद जगता यावे म्हणून   

अव्याहतपणे मशीन गन्स अन बॉम्ब्सशी खेळणार्यांचा
आवाज आमच्यापर्यंत पोहोचेलच कसा….?
कारण आम्ही तर नुसतेच रातकिडे
मानापमानाच्या रागात अव्याहतपणे किरकिरणारे

आनंदात त्यांना का स्मरावे?... आम्ही त्यांना स्मरातोच की
निसर्गाच्या कोपात... प्रलयकारी महापूरात... महाभयंकर भूकंपात 
पण आम्ही साफ विसरून जातोनिसर्ग कितीही कोपला तरी त्या दुर्धर परिस्थितीत कसलीही तमा बाळगता
एक एक जवान उभा राहतो मानवी पूल बनून.... आम्हाला जीवनदान मिळावे म्हणून 

काही नाहीतर आम्ही आहोतचजाती पातीच्या कुबड्यांवर
अहिंसेची विटंबना करून एकमेकांना संपवू पाहणारे ….
अन देशाच्या शत्रूंशी लढता लढता त्या जवानांना
अंतर्गत शत्रूंशीही लढायला भाग पडणारे….  

झोपू द्या.... झोपू द्या.... त्यांना... नका उठवू आता
आमच्या सारख्या भेकड जनतेची सेवा करण्यासाठी
कधी खडतर हवामानात तर कधी खडतर ट्रेनिंग मध्ये
जागलेत ते कित्येक काळ..... रात्रीचा दिवस करून

आता मिळालीय त्यांना चीरनिद्रा .......   
आता नका करू आक्रोश त्यांच्या नावाचा
अन नका देऊ पोकळ घोषणा अन नका करु खोटे जय जयकार
कारण आता ते पोहोचणार नाहीतच त्यांच्यापर्यंत

करायचेच असेल काही तर एकच करा….
त्या जवानाच्या उध्वस्थ कुटुंबाला आधार द्या
काहीच क्षण त्याने गोंजारलेल्या त्याच्या पिल्लांना माया द्या
आपल्यासाठी जीव जाळणाऱ्या जवानांना अभिमानाचा एक सलाम द्या... आपल्यासाठी जीव जाळणाऱ्या जवानांना अभिमानाचा एक सलाम द्या

© अभिजीत अशोक इनामदार
    नवी मुंबई, कामोठे

राज्याभिषेक (कथा)

राज्याभिषेक

लेखक: अभिजीत अशोक इनामदार

"आये भाकर दे... मल्हा सांगावा हाये… गडाव जाया पाहिज्ये...."

"का रं बाबा.... आता कुठं स्वारी हाय" 

"आगं कुठं स्वारी आसल तर आधी कुनास्नी बी ठाव नसतंय.... ते माझ्या सारख्या शिपायाला कळणार हाय व्हय? आगं आपलं राजं बादाश्या व्हणार... मोट्टा आभिषेक करणार..... मोठं सिंव्हासन व्हणार.... "

"आगं बाय खरं का? बरं झालं बाय. माझा ऱ्हाजा मोठ्ठा हुंदे". "शिरप्या तू जाणार हायस गडाव .... बघाया ते आभिषेक का काय ते ..."

"म्हायत न्हाय... हवालदारास इचारतो.... का गं?"

"मला बी घिऊन चल की संगट.... मल्हा ऱ्हाजाला बघाय भेटल... त्याचं कवतिक बघाय भेटल. लई खस्ता खाल्या त्यानं. तेच्यामूळच आज हे चांगलं दिस बघाय मिळत्यात नव्ह?.... न्हाय तर आपल्याली कोण इचारत व्हतं? समदं पाटील-देशमुख आपल्याले गिळाय टपलेले.... ऱ्हाजानी यवस्था केली अन चार घास मिळालं... घर दार शाबूत झालं... पोरंबाळं खाऊ पिऊ लागली... पिक पाणी आलं. राखलं गेलं... हे समदं ऱ्हाज्यामुळं झालं. मंग तेचं कवतिक बघाय मला बी जायचं हाय...."

"खुळी का काय? राजं तुझीच वाट बघत बसल्यात नव्हं तिथं.... कवा शिरपतीची आय येतीय मल्हा भेटाय.....  आगं मला जाया भेटल का न्हाय ते ठाव न्हाय.... अन म्हनं मला घेऊन चल... चल वाढ मला भाकर".

श्रीपती जेऊन गेला गडाच्या दिशेनी.... पण श्रीपतीच्या आईला काही चैन नव्हती. राजांच्या अभिषेकाला आपण जावं हि तिची खूप इच्छा होती. तो सोहळा आपण स्वतः च्या डोळ्यांनी पाहावा ही तिची मनोकामना… पण पूर्ण कशी होणार? पुढचा आठवडाभर काही काही घटना घडत होत्या... नवीन नवीन बातम्या कानी येत होत्या. अजून आठवड्यांनी राजांचा राज्याभिषेक होणार होता. श्रीपतीला गडाच्या बंदोबस्तासाठी तिथंच थांबावं लागणार होतं. झालं म्हणजे ती जी एक आशा होती पण धूसर झाली. लक्ष्मी बाईंच्यापुढे आता काय करावे हा प्रश्न होता... श्रीपती गडावर निघून गेला. त्याची बायको आणि मुलं काही दिवसांसाठी म्हणून तिच्या माहेरला निघून गेली. आता लक्ष्मीबाई एकट्याच राहिल्या घरी. आता आपण काहीही करू पण जाऊच असं त्याना वाटायला लागलं. पण राजांचा राज्याअभिषेक ज्या गडावर होणार होता तो कोणत्या बाजूस आहे, तिथे जायला किती वेळ लागेल हे काहीच माहित नव्हतं. पण त्यांनी ठाम निश्चय केला आणि राज्याभिषेकाच्या बरोबर दिवस आधी त्या आपली शिदोरी अन कपड्याचं बोचकं घेऊन पहाटे पहाटे घराबाहेर पडल्या. गावाबाहेर येऊन त्यांनी काही जणांना विचारलं अन आपल्याला कुठल्या बाजूला चाललं पाहिजे हे नक्की केलं अन मार्गक्रमण चालू झालं. बरच मोठं अंतर कसं संपणार या विचारात त्या चालत राहिल्या. दुपार झाली.... विसाव्याची जागा बघून शिदोरी सोडली... पाटाचं पाणी घेतलं अन जेवण उरकून घेतलं. थोडावेळ थांबून पुन्हा चालायला सुरवात. संध्याकाळ होताच नजीकच्या गावात धर्मशाळेत किंवा मंदिरात उतरायचं जेवण करून झोपायचं असं ठरवलं. त्यानुसार त्या एका धर्मशाळेत उतरल्या. बरोबरच्या शिदोरीतून जेवण बनवलं अन पाठ टेकली. दिवसभराच्या चालीने थकलेलं अंग निद्रिस्थ होऊ लागलं.... मध्यरात्रीच्या सुमारास काही तरी गडबड ऐकू येऊ लागली... पाठोपाठ घोड्यांच्या टापांचा आवाज. लक्ष्मीबाई जाग्या झाल्या. पाहता पाहता टापांचा आवाज धर्मशाळे बाहेर येऊन थांबला. सैनीक आत आला. लक्ष्मीबाईंच्या बरोबरच असलेले अजून एक कुटुंब ते ही घाबरले.

सैनिक "कौन हो... किधर से आये हो? किधर जाना है?"

त्या कुटुंबातील गृहस्थानी सगळे सांगितले "पाव्हण्याच्या मुलीच्या लग्नासाठी गेलो हुतो... गावाला परत चाललो"  असं म्हणून त्यांनी पिशवी काढून काही नाणी त्याला दिली. सैनिकांनी ती हळूच ठेऊन घेतली अन लक्ष्मीबाईंकडे वळला म्हणाला " बोलो... किधर जा रही हो? कहा से आई हो? " लक्ष्मीबाई घाबरल्या काय बोलावे कळेना... घशाला कोरड पडली धीर एकवटून म्हणाल्या "गडाव चाललीय... ऱ्हाजाला भेटाय अन तेचा अभीशेक बघाय..."

सैनिक कडाडला "खामोश... कौनसा राजा... काहे का अभीशेक? शरम नाही आती ऐसे बोलते हुये...  यहा राजा एक ही है सुलतान साहब... "

लक्ष्मीबाई "जनता मानती त्यो खरा ऱ्हाजा... आम्ही न्हाय मानत तुम्हच्या सुलतानाला"

सैनिक चिडला त्यांनी लक्ष्मीबाईना पकडून मारायला सुरुवात केली. त्या गयावया करू लागल्या आक्रोश करू लागल्या... पण ते ऐकायला तो तयार नव्हता... त्याना वाचवायला कोणीही नव्हते. बराच वेळ मारून सैनिक थांबला... अन माघारी वळला. त्याचा एक साथीदार बाहेर उभा होता. ते दोघेच होते. त्यांनी दुसऱ्या सैनिकाला झालेला प्रकार सांगितला. तो म्हणाला "ले के चलो साली को साहब के पास वही देखेंगे क्या करना है साली का"

भेदरलेल्या लक्ष्मीबाई भिंतीला टेकून बसलेल्या होत्या... आता काय होणार ह्या विचारात. आपण आज सकाळी किती आनंदात होतो. आपल्या राजाला पाहण्यासाठी आपण कोणालाही सांगता घराबाहेर पडलो... किती सोप्प वाटलं होतं सारं... राजाला जवळून पाहता येईल... कानशिला वर हात फिरवून त्याची इडा पिडा काढून टाकू.... अन अजून काय काय ...  आपल्या त्या विचारांचे आता त्याना हसू आले आणि आता आपले काय होणार या विचारात बसल्या. आपल्या ह्या प्रवासाच्या पहिल्याच रात्री आपल्या नशिबी हे काय वाट्याला आले? कदाचित आपल्या प्रवासाची ही पहिली रात्र ही आयुष्याची शेवटची रात्र तर ठरणार नाही ना या विचारांनी त्याना धडकी भरली.                 

तो पर्यंत ते दोघे सैनिक आत आले आणि म्हणाले "बुढीया चल हमारे साथ.... तुझे हम आज दिखाते है कौन असली राजा है...." त्यांना खेचून बाहेर आणण्यात आले. पुन्हा फरपट चालू झाली. त्यांना आता न्ह्यायचे कसे हा प्रश्न होता. शेवटी तिचे हात दोरीच्या एका टोकाने बांधण्यात आले आणि त्या दोरीचे दुसरे टोक हाती पकडून तो पहिला सैनिक त्याचा साथीदार आपापल्या घोड्यांवर स्वार झाले. जसे ते पुढे जाऊ लागले तसे लक्ष्मी बाई खेचल्या जाऊ लागल्या अन त्या घोड्यापाठी धाऊ लागल्या. आता आज आपलं काही खरं नाही ह्या विचारांनी त्यांना पुन्हा पुन्हा रडू येऊ लागले. काही अंतर पार होताच घोड्यांच्या टापांचे आवाज येऊ लागले... ते दोघेही सैनिक थांबले. आवाज जवळ जवळ येऊ लागला अन एकापाठी एक अशे १० घोड्यांनी त्यांना वेढले. त्यांच्या म्होरक्या एक पोक्ता माणूस होता. गालावर भरघोस पिळदार मिशा, डोक्याला पगडी, रुंद छाती, रेखीव नाक, भरगोस कल्ले, रुंद कपाळ, कपाळावर गंधाचा टिळा...  एकूणच भारदस्त व्यक्तिमत्व. धर्मशाळेत विसाव्यासाठी म्हणून आलेलं हे पथक त्यांना धर्मशाळेत आल्या आल्या घडलेला प्रकार कळला होता अन म्हणूनच हे पथक ह्याच्या मागावर बाहेर पडलं होतं. मिनिटांत त्या दोन सैनिकांचा धुव्वा उडवून लक्ष्मीबाईंना सोडवण्यात आले.

बजाजी घोड्यावरून उतरले अन म्हणाले "बाई कोण आपण? कुठे चाललात?"

लक्ष्मी बाईंनी कोण कुठल्या शिवाय कुठे अन कशासाठी चालल्या ते सांगितले त्यांना विचारले "आपण कोण?"

बजाजी म्हणाले "आम्ही बजाजी, राजांच्या सेनेत हाये. आता गडाकड चालूया... गडाच्या पायथ्याला एका बाजूच चौकी पाहारा आमच्या लोकांचा आहे. आमचं सरदार तिथंच हायती. त्यास्नीच भेटाय निघालुय".

लक्ष्मी बाईना आनंद झाला. आपणाला सोबत नेण्याची विनंती केली. त्यांनी नकार दिला. कोण कुठली बाई आपली ना ओळख ना पाळख उद्या तिथे जाऊन काही आफत आली तर... लक्ष्मी बाईना त्यांची अडचण कळली. त्यांनी आपला मुलगा श्रीपती  राजांच्याच सैन्यात आहे असे सांगितले. तिथल्या जवळच्या किल्लेदाराचे नाव सांगितले. ती माहिती ऐकून त्यांचा एक साथीदार म्हणाला "तरीच मगापासून आठवतुय... कुठ तरी बघितलया म्हातारीला...." अन तसाच बजाजींना म्हणाला "म्या ओळखतू शिरपतीला... त्याचीच माय हाय हि."

मग बजाजीनि तिला परत धर्मशाळेत आणली... दवा पट्टी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी लक्ष्मी बाईना घरी परत जाण्यास सांगितले. पण लक्ष्मीबाईनी नकार दिला परत आपल्याला सोबत न्यावे अशी विनंती केली.

बजाजी म्हणाले "बाई ऐका आमचं... परत कालच्या सारखा काही झालं तर? तुम्ही पुन्यांदा कधीतरी जावा म्हराजास्नी भेटाय... आता लई मोठी मोठी मानसं इनार हायेत. तुम्हास्नी न्हाई कुणी भेटू देणार... बरं आम्ही फकस्त पायथ्याला जाणार... गडाव जायाला  मिळलंच आसं काय बी न्हाय... जाऊ बी न्हाई बी."

लक्ष्मी बाई म्हणाल्या "राजा ह्यो माझ्यासाठी हाये आन मी त्येंची रयत हाये न्हवं? मग आमास्नी भेटाय येळ न्हाय असा न्हाय हुणार. अन राजांचं तुमच्या सारखं सैनिक असल्याव मल्हा कसली भ्या...? तुम्ही मला पायथ्या पातुर तर न्ह्या. न्हाईच वरती जाता आलं तर गड बघून यीन म्हागारी."            

हो नाही करता करता बजाजी तयार झाले अन पुढचा प्रवास चालू झाला. आता सोबतीला लोक होते त्यामुळे जरा थोडा धीर आला होता त्यांना. लक्ष्मीबाईना एका घोड्यावर बसवले होते ... तो घोडा मध्ये ठेऊन त्याच्या पुढे काही मागे काही असे घोडे धावत होते. दिवसांच्या धावणी नंतर ते पथक गडाच्या पायथ्याला पोहचले. पायथ्याला पोहचून दिवस झाले... कालपासूनच गडावर अभिषेकच्या पूजाविधी-समारंभ यांना सुरुवात झाली. तरी लक्ष्मी बाई गडाखालीच होत्या. बाजाजीनी त्यांची त्यांच्या सरदारांशी गाठ घालून दिली. पण ते स्वतःच बंदोबस्तात व्यस्त होते की या गोष्टीत लक्ष घालणे जमले नाही. लक्ष्मी बाई सारख्या बजाजीना आठवण करू देत होत्या. पण त्यांचाहि नाईलाज होता.

उद्या सकाळी राजे सिंहासनावर आसनस्थ होणार होते, छत्र धरी होणार होते. लक्ष्मी बाई तळमळत होत्या. गडावर, पायथ्याला प्रचंड गर्दी उसळली होती जो तो आनंदात होता. गडावर वरती जाण्यासाठी परवानगी लागत होती त्यामुळे लक्ष्मी बाई वरती जाऊ शकल्या नव्हत्या. संध्याकाळ झाली होती.... गडावरचे व्यापारी नरहर शेठ आपला नवीन आलेला माल वरती पाठवण्याच्या व्यापात होते. बजाजीनी त्यांना पहिले लक्ष्मीबाई बद्दल सांगितले. त्यांच्या सामानाची वाहतूक करणाऱ्या लोकांत त्यांना घेऊन जाण्याची विनंती केली. बजाजी म्हटली तर मोठी आसामी, सरदारांचे एकदम खास त्यांचे ऐकले तर पाहिजे म्हणून नरहर शेठ शेवटच्या टप्प्यातल्या असामींबरोबर लक्ष्मीबाईना घेऊन जाण्यास तयार झाले. रात्र बरीच झाली होती. तरी गडाचा चढणीचा रस्ता पूर्ण भरून होता. टप्प्या टप्प्यावर तपासणी होत होती. नरहर शेठ स्वतः बरोबर असल्याने जास्त काही त्रास ना होता लक्ष्मी बाई गडावर दाखल झाल्या. आपण एक अभूतपूर्व प्रवास करून गडापर्यंत पोहचलो याचेच त्यांना नवल वाटत होते. एवढा लांबचा प्रवास... केवढा मोठा गड... चढायला किती बिकट. राज्याभिषेकाची तयारी, सगळीकडे असलेला झगमगाट, दिव्यांची आरास, त्याने उजळून निघालेला संपूर्ण गड, राजांच्या एका शब्दावर काहीही करायला तयार असणारे हे सगळे लोक. हे सगळंच किती अलौकिक होतं, अद्भुत होतं, अवर्णनीय होतं. लक्ष्मी बाईनी हा असा तामजाम, डामडौल कधीच पाहिला नव्हता. हे सगळंच त्यांच्यासाठी नवीन होतं. पण त्या बरोबरच आपल्या राजाचं कौतुक वाटत होतं.

सततच्या प्रवासानी लक्ष्मीबाई थकल्या होत्या. नरहर शेठच्या माणसांनी त्यांना झोपण्याची व्यवस्था करून दिली. पडल्या पडल्या त्यांना झोप लागली. आगदी पहाटे पहाटेच राजांच्या अभिषेकाचे विधी चालू झाले होते . मंगल वाद्य वाजत होती. मंत्रांचे घोष सुरु होते  सगळीकडे गडबड, लगबग दिसत होती. लक्ष्मीबाई न्हाऊन माखून स्वछ् कपडे करून राजदरबाराकडे गेल्या. सर्व रस्ते तुडुंब भरलेले होते. सगळीकडे आनंदी आनंद होता. सगळ्या दारादारात सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या, लोकांनी गुढ्या उभारल्या होत्या. लोक नवे कपडे घालून बाहेर पडले होते. राजदरबाराचा परिसर लोकांनी फुलून गेला होता, मुंगीलाही शिरायला वाव मिळणार नाही एवढी गर्दी. स्त्रियांसाठी वरती असलेल्या चौथरयाकडे लक्ष्मी बाई गेल्या. सूर्योउदय काही वेळातच होणार होता. राजे सिंहासनारूढ होण्याकरिता आवरून त्यांच्या महालातून बाहेर पडल्याची वार्ता आली होती. मुहूर्ताचे घटिकापात्र घंगाळात बुडत आले होते. लक्ष्मीबाई चौथऱ्यावर चढून आगदी तन्मयतेने सिंहासनाच्या दिशेनी पाहत उभ्या राहिल्या. महाराज आले महाराज आले.... एकच गलका झाला. मुजरे झडले… नजरा झुकल्या....  सारे तन्मयतेने पाहू लागले. लक्ष्मीबाई राजांना डोळ्यात सामावू पाहत होत्या.... जमेल तेवढं त्यांचं ते रूप मनात साठवून घेत होत्या. आनंदानी त्यांचे डोळे भरून वाहू लागले. गेले -   दिवस केलेल्या अखंड श्रमाचं फळ मिळालं होतं. त्या अंगभर गदगदल्या.... राजमाताना वंदन करून राजे सिंहासनरूढ झाले.... शिंग फुंकली गेली... जयघोष झाले.... राजांच्या जय जयकारांनी परिसर दणाणून गेला. चिंब भिजल्या डोळ्यांनी लक्ष्मीबाई राजमातांच स्वप्न साकार होताना पाहत होत्या... अन त्याच वेळीं उंच स्वरात ललकरिचा आवाज घुमत होता.... गो ब्राह्मण प्रतिपालकsss  क्षत्रिय कुलावतंसsss सिंहासनाधीश्वरsss  महाराजाधीराजsss..........!!!!

(समाप्त)               

©अभिजित अशोक इनामदार
  कामोठे, नवी मुंबई ४१० २०९